• घर घर लंगर सेवेच्या वतीने गृहमंत्रीकडून कौतुक झाल्याबद्दल पोलीस उपाधिक्षक मिटके यांचा सन्मान

    अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी काळात शहराचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन गरजू लोकांची भूक भागविण्यासाठी दिवस-रात्र तब्बल 7 लाखाहून अधिक अन्न पाकिटचे वितरण केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे ट्विटरवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले. गृहमंत्री देशमुख यांच्याकडून पोलीस उपाधिक्षक मिटके यांचे कौतुक झाल्याबद्दल त्यांचा घर घर लंगरसेवेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, हरजीतसिंह वधवा, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, करण धुप्पड, अनिश आहुजा, सुनील छाजेड, संदेश रपारिया, दीपक कुकरेजा, कैलाश नवलानी, प्रमोद पंतम, जस्मितसिंह वधवा, सनी वधवा, राजा नारंग, सुनील मेहतानी, हरविंदरसिंह नारंग, राजेश कुकरेजा, पुरुषोत्तम बेट्टी आदी उपस्थित होते. पोलीस उपाधिक्षक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मागील साडेपाच महिन्यापासून घर घर लंगर सेवा सुरु आहे. लंगरसेवेच्या वतीने गरजूंना दोन वेळच्या जेवणासह अन्न-धान्य, किराणा किट, शालेय साहित्य आदिंचे वाटप करण्यात आले. लंगर सेवा ही टाळेबंदी काळात शहरातील गरजूंची भूक भागविण्यासाठी मोठा आधार बनली.