• वासन टोयॅटोच्या वतीने घर घर लंगरसेवेच्या सेवेदारांचा सन्मान कोरोनाच्या संकटकाळात लंगरसेवेने भुकलेल्यांना दिला आधार -जनक आहुजा

    अहमदनगर(प्रतिनिधी)- सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती व नगर पोलीस दलाच्या योगदानाने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात सुरु करण्यात आलेल्या घर घर लंगर सेवेच्या सेवादारांचा सन्मान वासन टोयॅटोच्या वतीने करण्यात आला. शहराच्या टॉपअप पेट्रोल पंम्प येथून लॉकडाऊनच्या पहिला दिवसापासून 350 डब्यांनी सुरु झालेली लंगरसेवा लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात देखील अविरत सुरु आहे. लंगरसेवेच्या माध्यमातून 75 दिवस अविरतपणे दुपार व संध्याकाळी शहरात अडकलेले, घरी परतणारे परप्रांतीय मजूर, हातावर पोट असलेले कामगार व गरजूंना दोन वेळेसचे जेवण देण्यात आले. आज पर्यंत साडे तीन लाख पेक्षा अधिक डबे लंगर सेवेच्या माध्यमातून गरजूंना पुरविण्यात आले आहे. यामध्ये सेवेदारांनी कोरोनाच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता गरजू भुकलेल्यांना दोन वेळचे जेवण दिले. या सेवेदारांचा वासन टोयॅटोच्या वतीने जिल्हा पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, पो.नि. विकास वाघ, प्रितपाल धुप्पड, उध्दव तलरेजा, दामोदर माखीजा, किशोर मुनोत, दिनेश चोपडा, विपुल शहा, ईश्‍वर बोरा, अभय लुनिया आदि उपस्थित होते. संकटकाळात लंगर सेवेच्या सेवेदारांनी केलेल्या कार्याचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी कौतुक केले. जनक आहुजा म्हणाले की, कोरोना महामारीच्या जागतिक संकटात जेंव्हा संपुर्ण जग लॉकडाऊनाध्ये घरी सुरक्षित होते. तेंव्हा लंगर सेवेच्या सेवेदारांनी कोणी उपाशी राहू नये या ध्येयाने 75 दिवस गरजूंना डबे पोहचविण्याचे निस्वार्थ भावनेने कार्य केले. या संकटकाळात लंगरसेवेने भुकलेल्यांना मोठा आधार दिला. कोणतीही मनात भिती न ठेवता स्वत:ची व इतरांची काळजी घेऊन प्रत्येक सेवेदारांनी गरजू पर्यंत भोजन पोहचविले. शहरात कोणताही व्यक्ती उपाशी राहिला नाही. या उपक्रमास पोलीस प्रशासनासह दानशूर व्यक्तींची मोठी साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले. विजय वासन यांनी नगरमध्ये कोरोनाच्या संकटकाळात झालेली सेवा इतिहासात नोंद होण्यासारखी आहे. सर्व सेवेदारांनी तन, मन, धनाने योगदान देऊन देवदूताची भूमिका पार पाडल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, अनिश आहुजा, सनी वधवा, करण धुप्पड, टोनी कुकरेजा, रोहित टेकवाणी, राम बालानी, जस्मितसिंह वधवा, कैलाश नवलानी, विकी मेहेरा, गोविंदा खुराणा, राहुल बजाज, राजा नारंग, अजय पंजाबी, संतोष तोडकर, वंदना गांधी, श्रीमती आडेप, शैलेंद्र बगाडे, श्री बालकृष्णन, महेश गुंदेचा, महेश धुमाळ, डॉ. संजय आसनानी, भारत बागरेचा, दिनेश छाबरिया, कौशिक शिरहट्टी, संदेश रपरिमा, सुनील मेहतानी, मनित भल्ला, अंकित भूटानी, नारायण अरोरा, रोहित टेकवाणी, राहुल शर्मा, सिमर वधवा, विकी मेहरा, अमोल कोल्हे, विनायक कुलथे, गगन कुकरेजा, सुरेश कुकरेजा, दलजीतसिंह वधवा, सागर पंजाबी, आशिष कुमार, हरविंदरसिंह नारंग या सेवेदारांचा सन्मान करण्यात आला.