• कोरोनाच्या संकटकाळात घर घर लंगरसेवेनी केली वंचितांची ईद गोड गरजूंना फुड पॅकेटसह शेवईचे वाटप

    अहमदनगर(प्रतिनिधी)- सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती व नगर पोलीस दलाच्या योगदानाने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात सुरु असलेल्या घर घर लंगर सेवेच्या वतीने रमजान ईद निमित्त गरजूंना फुड पॅकेटसह गोड शेवई पाठविण्यात आले. शहरात अडकलेले, घरी परतणारे परप्रांतीय मजूर, हातावर पोट असलेले कामगार व गरजूंना दोन वेळेसचे जेवण पुरविण्याचे कार्य घर घर लंगरसेवा करीत आहे. कोरोनाच्या संकटकाळात वंचित व गरजूंची ईद गोड करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक सागर पाटील, पोलीस अधिक्षक संदिप मिटके, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव मन्सूर शेख, उद्योजक करिमशेठ हुंडेकरी, उबेद शेख, हाजी अब्दुल कादीर सर, प्रा.मुदस्सर सय्यद यांच्या हस्ते शेवई व फुड पॅकटेची पॅकिंग करण्यात आली. यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, किशोर मुनोत, विपूल शाह, अनीश आहुजा, सनी वधवा, करण धुप्पड, टोनी कुकरेजा, रोहित टेकवाणी, राम बालानी, जस्मितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, कैलाश नवलानी, विकी मेहेरा, गोविंदा खुराणा, राहुल बजाज, राजा नारंग आदि उपस्थित होते. सामाजिक जाणीव ठेऊन सुरु करण्यात आलेल्या लंगरसेवेने माणुसकीचे दर्शन घडत आहे. कोरोनाच्या संकटकाळात रोजगार बुडालेल्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना ही लंगरसेवा मोठी आधार बनली असल्याची भावना अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी व्यक्त केली. हरजितसिंह वधवा यांनी या लंगरसेवेच्या माध्यमातून साडेतीन लाखपेक्षा जास्त फुड पॅकेट गरजूंना पोहचविण्यात आले आहे. शहरातील गरजूंना एका कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे जेवण पुरविण्याचे कार्य सुरु आहे. हायजनिक पध्दतीने भोजन बनवून तर फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन या मिष्टान्न भोजनाचे पॅकेट वितरित केले जाते. 15 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या लंगरसेवेचा लाभ घेतला असून, ईदचा गोडवा वृध्दींगत करण्यासाठी शेवईचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ईदच्या दिवशी दिड हजार गरजूंना फुड पॅकेटसह शेवईचे वाटप करण्यात आले. यासाठी जिवीतराम हिरानंदानी, उध्दव तळरेजा, कौशिक शिरसाठ (यूएसए), जावेद सुभेदार यांचे आर्थिक सहकार्य लाभले.