• शहरातील घर घर लंगरसेवेचे खासदार विखेंकडून कौतुक लंगरसेवेच्या उपक्रमाची केली पहाणी

    अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून सुरु असलेल्या घर घर लंगर सेवेच्या उपक्रमाची खासदार सुजय विखे यांनी पहाणी केली. विखे यांनी नुकतेच पोलीस मुख्यालय येथील सभागृह येथून सुरु असलेल्या लंगरसेवेच्या कार्याची माहिती जाणून घेतली व सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले. सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती व नगर पोलीस दलाच्या योगदानाने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून शहरात अडकलेले, घरी परतणारे परप्रांतीय मजूर, हातावर पोट असलेले कामगार व गरजूंना दोन वेळेसचे जेवण पुरविण्याचे कार्य घर घर लंगरसेवा करीत आहे. या लंगरसेवेच्या माध्यमातून अनेक भूकेलेल्यांना जेवण मिळाले. साडेतीन लाखापेक्षा जास्त जेवणाचे पाकिट पुरविण्यात आले असून, सुमारे 15 हजार पेक्षा जास्त गरजूंनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली. यावेळी पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके, अ‍ॅड. धनंजय जाधव, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, किशोर मुनोत, विपूल शाह, अनीश आहुजा, सनी वधवा, करण धुप्पड, टोनी कुकरेजा, रोहित टेकवाणी, राम बालानी, जस्मितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, कैलाश नवलानी, विकी मेहेरा, गोविंदा खुराणा, राहुल बजाज, राजा नारंग आदिंसह लंगरसेवेचे सेवादार उपस्थित होते.