लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही शहरात घर घर लंगरसेवा अविरत सुरु भुकेलेल्यांना लंगरसेवेने दिले दोन वेळचे जेवण 3 लाख भोजन पॅकेट वाटपाचा आकडा पार शहरातील सुमारे 10 हजार गरजूंना भोजनचे वितरण सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब व नगर पोलीस दलाचे योगदान
अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील विविध समाजातील बांधव, सामाजिक संस्था, उद्योजक आदींनी एकत्र येऊन लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेल्या घर घर लंगर सेवा या उपक्रमामुळे आतापर्यंत सुमारे 3 लाख मिष्टान्न भोजन पॅकेट वितरित करण्यात आले आहे. यामुळे शहरात अडकलेले परप्रांतीय मजूर, हातावर पोट असलेले कामगार व गरजूंना भोजन मिळाल्याने ते तृप्त झाले आहेत. देशासह महाराष्ट्रात दि.31 मे पर्यंत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा झाली असताना हातावर पोट असलेले कामगार व गरजूंची अविरतपणे दोन वेळची भूक भागविण्यात येणार असल्याची भूमिका लंगरसेवेच्या सहकार्यांनी व्यक्त केली. कोरोनाचा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच शहरात गरजूंची भूक भागविण्यासाठी घर घर लंगर सेवा सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात टॉप ऑप पेट्रोल पंम्पपासून सुरु झालेली ही लंगर सेवा सध्या व्यापक प्रमाणात पोलीस मुख्यालय येथील सभागृहाच्या ठिकाणाहून चालत आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळावधी लोटत असताना गरजूंना हायजनिक पध्दतीने भोजन बनवून तर फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन या मिष्टान्न भोजनाचे पॅकेट वितरित करण्याचे काम अविरत सुरु आहे. 10 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या लंगरसेवेचा लाभ घेतला असून, घर घर लंगरसेवा संकट काळात गरजूंसाठी मोठी आधार बनली आहे. या सेवेसाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत असून, या लगरसेवेसाठी जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, जिल्हा पोलीसप्रमुख सागर पाटील, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, पृथ्वीपालसिंह धूपर, जनक आहुजा, सुनील छाजेड, किशोर मुनोत, विपूल शाह, अनीश आहुजा, सनी वाधवा विशेष परिश्रम घेत आहे. तर लंगरसेवा अविरत सुरु राहण्यासाठी अजय पंजाबी, अहमदनगर मशिनरी असोसिएशन, कल्पतरू फिरोदिया एन्टरप्राईज, सीख, पंजाबी, सिंधी, जैन व गुजराती समाज, जयआनंद फाउंडेशन, पंजाबी सेवा समिती, सेवा प्रीत, समर्पण ग्रुप, गुरुद्वारा भाई दया सिंहजी, जीएनडी ग्रुप, शरद मुनोत, वंदे मातरम, एल अॅण्ड टी, दिनेश चोपडा, ईश्वर बोरा, संतोष तोडकर, वंदना गांधी, श्रीमती आडेप, शैलेंद्र बगाडे, श्री बालकृष्णन, महेश गुंदेचा, डॉ. संजय आसनानी, भारत बागरेचा, दिनेश छाबरिया, स्ट्राइकर ग्रुप, सेक्रेड हार्ट 89, 94 और 75 बैच, हॉटेल सुवर्णम प्राइड, उद्धव तलरेजा, कौशिक शिरहट्टी, जनक आहुजा, वाधवा परिवार आदि योगदान देत आहे. या सेवेत राजा नारंग, राहुल बजाज, गोविंद खुराना, संदेश रपरिमा, दामोदर मखीजा, सुनील मेहतानी, मनित भल्ला, अंकित भूटानी, नारायण अरोरा, रोहित टेकवाणी, राम बालानी, राहुल शर्मा, सिमरन वधवा, विकी मेहरा, अमोल कोल्हे, विनायक कुलथे, जसमीतसिंह वधवा, राम बालानी, गगन कुकरेजा, सुरेश कुकरेजा, सूरज, दलजीतसिंह वधवा, सागर पंजाबी, आशिष कुमार, हरविंदरसिंह नारंग आदी विविध जबाबदार्या पार पाडत आहेत.